भैरवनाथ उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी काल दिनांक 9 ऑक्टोंबर 2024 ला दांडीया उत्सवाचे आयोजन केले होते. श्री संत तनपुरे महाराज मठामध्ये संध्याकाळी सहा वाजता या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या दीड महिन्यांपासून भैरवनाथ साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन अनिल सावंत यांच्याकडून महिलांसाठी पैठणी या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे.
महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, महिलांचा सामाजिक कार्यक्रमात अधिक सक्रिय सहभाग असावा. यासाठी सातत्याने गेल्या दीड महिन्यांपासून खेळ पैठणीच्या खेळाचे आयोजन केले जात आहे.नवरात्र उत्सवानिमित्त काल पुन्हा एकदा महिलांसाठी दांडीया खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळाच्या विजेत्यांना 18 आकर्षक बक्षीस देखील देण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. अनिल सावंत आणि पत्नी शैलजा सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभार NIT कॉम्प्युटरचे संचालक शाम गोगाव यांनी केले. प्रस्ताविक करताना श्याम गोगाव म्हणाले, अनिल दादा सावंत महिलांसाठी गेल्या दीड महिन्यांपासून पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. महिला ह्या सामाजिक विचारांचा कणा आहेत. समाजात महिला सक्षम बनली तरच समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगती करत असतो. महिलांनी सक्षम बनविण्यासाठी येणाऱ्या अडचणी समजून त्या दृष्टीने पावले टाकता यावी, त्यासाठी अनिल दादा सावंत अशा कार्यक्रमाचे आयोजन करतायत.
महिला सक्षमीकरणावर त्यांचे विचार आणि असणारे उद्दिष्ट लक्षात घेऊन, आपण त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मदत करणे आवश्यक असल्याचं शाम गोगाव यांनी सांगितले.
उपस्थित महिलांशी बोलताना अनिल सावंत म्हणाले, सर्वप्रथम उपस्थित सर्व महिलांना नवरात्रीच्या मी शुभेच्छा देतो. मला माहिती आहे, तुम्हाला माझं भाषण ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, तुमचं लक्ष दांडीया खेळावर आहे. परंतु समाजामध्ये तुमचं असणारं महत्त्व तुम्ही ओळखणे आवश्यक आहे. गेले दीड महिना आपण यासाठी खेळ पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करतोय. दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण दांडिया खेळत असलो तरी दांडिया हा खेळ पारंपारिक संस्कृतीचे दर्शनही घडवतो. याबरोबरच बंधुता, एकात्मतेचा देखील संदेश देतो. त्यामुळे या खेळाला विशेष महत्त्व आहे. विषय सहकार्याबद्दल मी NIT कॉम्प्युटर्स, आर्यन उत्पाद आणि अश्वरी ब्युटी पार्लर यांचे विशेष आभार मानतो. महिलांना समजेल अशा प्रकारे खेळ घ्या, अशी मी विनंती करतो.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर नीरज शहा, NIT कम्प्युटरचे संचालक श्याम गोगाव, स्वागत कदम समाधान जाधव, गुरु टीगळे, आणि भैरवनाथ उद्योग समूहाचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दांडिया या खेळाला NIT कम्प्युटर्स, आर्यन उत्पाद, आणि अश्वरी ब्युटी पार्लर यांचे विशेष सहकार्य होते.
कार्यक्रमाचे इव्हेंट मॅनेजमेंट फारुख काझी यांनी केले. हर्ष डिजिटलचे गणेश बोडके, मार्तंड ॲडवर्टाइजमेंटचे अनिकेत मेटकरी, अनंत तनपुरे यांचेही विशेष सहकार्य होते. एलईडी टीव्ही, ओव्हन, मिक्सर, सायकल, साऊंड बार, अशी अनेक आकर्षक 18 बक्षीसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस एलईडी टीव्ही मिसेस गुप्ता यांना मिळाली.
दांडीया खेळामधून अठरा विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. अनिल सावंत आणि पत्नी शैलजा सावंत यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. आणि कार्यक्रमाची सांगता झाली.