स्वेरी मध्ये सीईटीचे फॉर्म भरण्याची मोफत सुविधा
पंढरपूरः. ‘शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या ‘एमएचटी- सीईटी-२०२३’ या परिक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याच्या तारखा जाहीर झाल्या असून बुधवार, दि.०८ मार्च २०२३ पासून ते शुक्रवार, दि.०७ एप्रिल २०२३ (रात्री ११.५९ वा.) पर्यंत रजिस्ट्रेशन करण्याची मुदत दिली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
इंजिनिअरींग व फार्मसीच्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी ‘एमएचटी-सीईटी २०२३’ ही परीक्षा लवकरच राज्यभर होणार असून या एमएचटी- सीईटी २०२३ च्या नोंदणीकरिता बुधवार दि. ०८ मार्च २०२३ ते शुक्रवार दि.०७ एप्रिल २०२३ (रात्री ११. ५९) पर्यंत मुदत दिली आहे. तरी बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर इंजिनिअरींग व फार्मसीसाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘एमएचटी-सीईटी २०२३’ चे रजिस्ट्रेशन करणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी व पालकांच्या सोयीच्या दृष्टीने मोफत रजिस्ट्रेशन करण्याची सोय गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये केली आहे. सदर अर्ज भरण्यासाठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे, आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम अथवा फोन पे/गुगल पे सुविधा असणारा मोबाईल सोबत आणणे आवश्यक आहे.
अर्ज भरताना होणाऱ्या चुका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी खात्रीशीर अर्ज नोंदणी करावी व या प्रक्रियेत चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. या ‘एमएचटी-सीईटी २०२३’ च्या ऑनलाईन नोदणीसंबंधी अधिक माहितीसाठी मोबा.नं.–८९२९१००६१३ व ९५९५९२११५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी केले आहे तसेच विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.