काही महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते मंत्री नितिन गडकरी या पंढरपूर कुर्डूवाडी पालखी महामार्गाचे कामाचे लोकार्पण सोहळा करण्यात आले.
पण सिमेंट कॉंक्रीटच्यानव्याने बांधण्यात आलेल्या पंढरपूर कुर्डूवाडी सिमेंटकाँक्रेट रस्ता हा रस्ता प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे वर्ग करण्यात आले असल्याने, या कामाची सुरुवात गेल्या तीन वर्षापासून होत असून रस्ता रोडवेज सोल्युशन इंडिया या कंपनीला रस्ता बांधण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आहे
पण हे काम या कंपनीने दोन वर्षात हा स्ता पूर्ण केले आहे पण राहिलेले काम मात्र कासवाच्या गतीपेक्षाही काम करत आले .या पंढरपुर कुर्डूवाडी रोड हा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले असून शासनाचे 212 कोटी गेले खड्ड्यात असेच म्हणावे लागेल.
पंढरपूर कुर्डुवाडी रस्त्यावर प्रवास करत असताना अनेक ठिकाणी गोधडीला ठिगळ लावल्यासारखं शंभर-दोनशे मीटरवर पॅच मारण्यात आलेले आहेत. तर काही ठिकाणी काँक्रीट रोड वर डांबर टाकण्याचेही प्रकार दिसत आहे, या कामासंदर्भात अनेक स्थानिक सुज्ञ नागरिकांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार दिले असता पण या ‘रोडवेज सोल्युशन इंडिया’ या कंपनीने केराची टोपली दाखवण्यात आली.
तसेच या पंढरपूर-कुर्डुवाडी 48 किलोमीटर मध्ये या दोन वर्षात अपघाताची मालिका सुरूच आहे कुठल्याही प्रकारचं या रोडला दिशादर्शक अथवा गतीचे समयसूचकता फलक लावण्यात आलेले नाहीत. या कामाचे मुदत संपूनही अनेक ठिकाणी पुलाचे काम अर्धवट राहिले असून या पुलावर किरकोळ गंभीर अपघात होऊन अनेक जण यमसदनी सुद्धा झाले आहेत तरीही या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ असलेल्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला का कळत नाही हा प्रश्न नागरिकाच्या मनात उभा राहतोय.
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या कामाची पाहणी केल्यानंतर रोड अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सांगितले.जिथे जिथे कॉंक्रिटचा वरचा लियर निघून गेले असून तिथे तिथे मात्र तो भाग काढून टाकण्यात यावा असे आदेश दिले आहेत, पण या आदेशाची सुद्धा फक्त मोजक्याच ठिकाणी ही रोडवेज सोल्युशन इंडिया ही कंपनी काम करत असल्याचे दिसते
आम्हाला पूर्वीचाच डांबरी रस्ता बरा होता असे स्थानिक नागरिकांचे म्हणण्याचे ही वेळ आता आली आहे.!