आपल्या वडिलांचे बाहेर काहीतरी सुरु आहे याची कल्पना मुलाला आईने सांगितल्यावर आली , मात्र आता विचारावे कसे म्हणून मुलाने बापाचा पाठलाग सुरु केला आणि तब्बल ८०० किलोमीटर बापाच्या मागावर राहिला मात्र अखेर त्याला बापाला रंगेहाथ धरण्यात यश आले. मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये प्रेयसीसोबत असलेल्या वडिलांना त्यांच्या मुलाने रंगेहाथ पकडलं आणि तिथेच जोरदार राडा झाला. राडा झाल्यावर या बापाला हॉटेलमधून देखील हाकलण्यात आले. मुलाने आपल्या वडिलांचा एक व्हिडीओ देखील काढला असून सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
उपलब्ध वृत्तानुसार , वडिलांना रंगेहाथ पकडण्यासाठी मुलगा ग्वाल्हेरवरून जयपूर आणि जयपूरवरून उज्जैनपर्यंत पोहोचला होता . मुलाच्या वडिलांचे नाव आलोक चौधरी असून त्यांचे वय ६२ वर्षे आहे. त्याचं एका 59 वर्षीय महिलेसोबत फेसबुकवर सूत जुळलं आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आलोक चौधरी यांच्या पत्नीला पतीच्या प्रेमप्रकरणाचा संशय आला आणि त्यांनी मुलाला वडिलांवर लक्ष ठेवायला सांगितलं.
आलोक चौधरी खाजगी कंपनीत काम करत असल्याने कंपनीच्या कामासाठी बाहेर चाललो आहे, असे सांगताच बायकोच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तिने आपल्या मुलाला बापाचा पाठलाग करायला सांगितलं. आईचा हुकूम मिळताच मुलाने देखील आपली यंत्रणा वापरली आणि बापाच्या कारनाम्याचा अभ्यास सुरु केला. बापाचे नक्की काहीतरी बाहेर आहे , हे कंफर्म झाल्यावर त्याने पाठलाग सुरु केला.
आलोक चौधरी अगोदर जयपूरला गेले. जयपूरला प्रेयसीला सोबत घेतले आणि मग ते उज्जैनला गेले. उज्जैनमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांनी एक रुम बुक केली आणि तिथं एकत्र राहू लागले. आईच्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपण वडिलांचा पाठलाग सुरू केल्याचं मुलाने सांगितलं. आलोक चौधरी हे पत्नीवरच संशय घ्यायचे आणि चक्क ह्या वयात घटस्फोटासाठी दबाव टाकत होते, त्यामुळे त्यांच्या पत्नीचा त्यांच्यावरील संशय बळावला आणि हा सगळं पर्दाफाश झाला