प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, व आरोग्यम् ओपीडी मोहोळच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मोहोळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील महिलांसाठी मोफत मेंदू,मणका व मज्जारज्जू तसेच किडणीविकार तपासणी शिबीर व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.सुरवसे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा जिजाऊ ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष उज्वला साळुंखे यांच्या हस्ते आदर्श महिला पुरस्कार देऊन विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या गोल्डन गर्ल डॉ. स्वाती कांबळे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे,डॉ. दिलीप कादे, डॉ. अमोल देगावकर, डॉ. गजानन पिलगुलवार,डॉ. सुधाकर गायकवाड, डॉ. नुरखान खान, डॉ.जिलानी खान, आरोग्यम् मेडिफार्मा प्रा.लि.चे चेअरमन व कार्यक्रमाचे संयोजक सचिन शास्त्री आदी उपस्थित होते. मोहोळ शहरासह तालुक्यात सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रिडा व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. प्रतिभा व्यवहारे आरोग्यसेवा रा. आष्टी, शेख शहनाज कोरबू – आरोग्य सेविका रा. मोहोळ,प्रगती लोंढे आरोग्य सेविका, ग्रा. रु. मोहोळ रा. कोन्हेरी, बेबीसरोजा सुरवसे आरोग्यसेविका प्रा. आ. केंद्र नरखेड रा. नरखेड, अनुराधा नागापूरे, शिक्षण रा. इं.क. प्रशाला मोहोळ, राजरत्ना जावळे व्यवस्थापिका, म.आ. वि.म.रा. मोहोळ,यशोदा कांबळे सामाजिक कार्य रा. मोहोळ, नंदा जाधव अंगणवाडी सेविका, नरखेड, मयुरी चवरे, उपसरपंच ग्रा. पं. पेनूर,शितल सावंत आशा गटप्रवर्तक, रा. तेलंगवाडी, संजीवनी गुंड महिला उद्योजक रा. मोहोळ, गीता नगरे फोटोग्राफर रा. मोहोळ, कु.शिवाली कुंभार -क्रीडा रा.मोहोळ, विमल माळी कवायित्री,रा. अनगर,जयश्री गवळी शेती रा.पेनूर,सारीका सलगरे, पोलीस कॉन्स्टेबल रा.मोहोळ , अॅड. सोनल जानराव विधिज्ञ रा. मोहोळ, केशरबाई जाधव प्रामाणिक कार्य रा. मोहोळ आदी महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
प्राचार्य उज्वला साळुंखे यावेळी बोलताना म्हणाल्या की, स्त्री म्हणजे मांगल्य पावित्र्य त्या माध्यमातून स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. याठिकाणी सन्मानित करण्यात आलेल्या महिलांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्य पाहिले असता मी भारावून गेले असून हा माझाच सन्मान झाल्याचा मला आनंद होत आहे. असे सांगत या औषधी दिनाच्या निमित्ताने पुरुषांनी महिलांचा केलेला सन्मान हाच आपला भाग्याचा सन्मान असल्याचे सांगितले. सोलापूर विद्यापीठाच्या गोल्डन गर्ल डॉ. स्वाती कांबळे या वेळी बोलताना म्हणाल्या या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामीण भागातील सर्व क्षेत्रातील अष्टपैलू महिला बघायला मिळाल्या. स्त्री म्हणजे त्याग, स्त्री म्हणजे सहनशीलता, स्त्रीने स्वातंत्र्य व स्वैराचार या मधला फरक ओळखला पाहिजे. स्त्रियांनी स्वतःला कमी लेखणे सोडून दिले तर नक्कीच त्यांची यशाकडे प्रगती होईल असेही त्या या वेळी शेवटी बोलताना म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्यम् पी. डी. चे सचिन शास्त्री यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. प्रमोद कोरे व भारत नाईक यांनी केले शेवटी आभार संजय आठवले यांनी मानले.