आरोग्याची वारी,पंढरीच्या दारी, महा-आरोग्य शिबिराला झाली सुरुवात..!

पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली पंढरपूर येथे वारकरी भाविक भक्तांच्या साठी महाआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी गेली दोन वर्ष वारकरी भाविक भक्तांच्या आरोग्याची जपणूक करण्याचा उद्देशाने व वारकरी भाविक पायी चालत येत असताना कोणाला जखम झाली असेल कुणाला सर्दी पडसे व अन्य आजार असतील अशा वारकरी भाविक भक्तांच्या साठी औषध उपचाराची सोय या महाआरोग्य शिबिराच्या मधून करण्यात येणार आहे.

दिनांक 15 जुलै 2024 पासून ते 18 जुलै 2024 पर्यंत ही महाआरोग्यसेवेची सेवा वारकरी भाविक भक्तांच्या साठी मोफत दिली जाणार आहे. आरोग्य सेवा केंद्र पंढरपूर शहराच्या लगत वाखरी येथे ही सुविधा उपलब्ध आहे. तसेच गोपाळपूर येथे महा आरोग्य सेवा उपलब्ध आहे. चंद्रभागेच्या तिरी असलेले 65 एकर या परिसरामध्ये आरोग्य सेवा वारकऱ्यांच्या साठी उपलब्ध आहे. तीन रस्ता या परिसरामध्ये देखील आरोग्य सेवेची केंद्र उभारण्यात आलेले आहे. या महाआरोग्य सेवेमधून वारकऱ्यांच्या साठी मोफत औषधोपचार व ऑपरेशन केले जाणार आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज रोजी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *