आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक एकत्रितपणे येऊन जगाला संदेश देणारा हा वारकरी भाविक.वारी हा एक आनंद सोहळा..!
पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते. काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात. ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून वारक-यांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, कपडे, वर्षावस्त्र देणे अशी सेवा केली जाते. सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था या सुद्धा वारक-यांना विविध सुविधा पुरवितात. यामध्ये त्यांची सेवा करणे असा भाव असतो.
पंढरपुरात विठुरायाच्या भेटीच्या ओढीने लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होतात त्यांच्याबरोबर संतांच्या पालख्या पंढरपुर शहरात प्रवेश करतात यामध्ये अनेक भाविकांना आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात अनेक ठिकाणी वारकऱ्यांना खिचडी व केळी वाटप करण्यात येते मात्र अशीच एक परंपरा आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी आलेल्या वारकरी भाविकांना मनीषा नगरीतील भैय्या मांदळे व सनी अलंकार यांनी या भागातून आलेल्या सर्व वारकऱ्यांना व भाविकांना खिचडी व केळी वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आशिष मांदळे,अमर मांदळे,विजय घुले, पांडुरंग भिंगे, सुनील कुलकर्णी,आप्पा निस्ताने, गीता मांदळे, जयश्री अलंकार, वाघ ताई व भैय्या मांदळे मित्र परिवार उपस्थित होता.