आष्टी येथील नूतन विद्यालयाची ‘शेतकऱ्याची बहुपयोगी काठी’ झाली राज्यस्तरीय वर निवड..।

आष्टी- सन 2020-21 जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनातून नूतन विद्यालयाच्या वस्तूची राज्य स्तरासाठी निवड करण्यात आली.
या प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील ६४ विद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला होता. यातील ७ वस्तूंची निवड राज्य स्तरासाठी करण्यात आली. त्यात नूतन विद्यालयाच्या ‘शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी काठी’ (Multipurpose Stick for farmers) या वस्तूची निवड करण्यात आली.
ही वस्तू प्रशालेचा विद्यार्थी चि. विकास कैलास इंगळे याने तयार केली व त्यासाठी श्री अमित दुरूगकर सर यांनी या विद्यार्थ्यांला मार्गदर्शन केले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याचा विचार करूनच शेतकऱ्यासाठी बहुपयोगी अशी काठी बनवण्याचा विचार विकासच्या डोक्यात आला आणि त्याने तो या काठीचा रूपाने प्रत्यक्षात उतरविला. या काठीचा उपयोग रात्री शेतात काम करताना विजेरी (टॉर्च), टेस्टर, तसेच गवत कापणी यंत्र, फवारणी यंत्र म्हणून होतो. तसेच ही काठी जलरोधक असून हाताळण्यास अतिशय सोपी आहे. अशा या बहूपयोगी काठीची निवड राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

या यशाबद्दल यशस्वी विदयार्थी चि.विकास इंगळे व मार्गदर्शक शिक्षक श्री.अमित दुरुगकर सर यांचे वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजितभाई गांधी , विश्वस्त भूषणभाई शहा, परागभाई शहा, प्राचार्य आशितोष शहा सर, मुख्याध्यापक अजित हेरले, सर्व ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *