कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये स्वेरीच्या २७ विद्यार्थीनींची प्लेसमेंटद्वारे निवड..!

कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित पदविका (डिप्लोमा) अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल २७ विद्यार्थीनींची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून स्वेरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून प्लेसमेंटच्या माध्यमातून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यामुळे आता आणखी भर पडली आहे. पदवी अभियांत्रिकी पाठोपाठ डिप्लोमा देखील प्लेसमेंट मध्ये आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे.

कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून वनमाला तानाजी पवार, दीक्षा चंद्रकांत शिंदे, दीक्षा प्रकाश हुंडे, शिल्पा दाजी बेळे, दीक्षा दीपक निंबाळकर, स्वप्नाली ब्रम्हदेव सुरवसे, प्रज्योती राजेश कुंभार, सलोनी दत्तात्रय घोडके, संध्या अनिल पवार, शिवाई दिलीप भोसले, साक्षी चंद्रकांत बंगाळे, वेदश्री तुकाराम बारसावडे, आरती तानाजी चव्हाण, जान्हवी सुरेश तरंगे, पूजा महादेव मुळे, साक्षी दिनकर मुळे, साक्षी कैलास बाबर, सपना सिद्धेश्वर वागज, अलिशा बालम मुलाणी, स्वप्नाली किरण पवार, समृद्धी काशिनाथ शेटे, निकिता नागेश होनराव, येडेश्वरी मनोज गुल्हाणे, निकिता बिभिषण कोष्टी, सुकन्या रत्नकांत कुलकर्णी, अवंतिका राजेश कदम आणि वेदांती महेशाचार्य उत्पात या २७ विद्यार्थिनींची निवड केली. या विद्यार्थिनींना प्रत्येकी वार्षिक २.०४ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागामार्फत आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत.

स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते. मागील वर्षी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे पदवीच्या विद्यार्थ्यांना तब्बल ६०० हून अधिक नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्यात आल्या. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी ‘कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. दहावी नंतर विद्यार्थी त्वरित डिप्लोमाकडे वळू लागले असून डिप्लोमा नंतर देखील विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध होत आहे हे अधोरेखित होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *