श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तसेच मंगळवेढ्यात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम घेतले. त्यातच कौठाळीचे युवा नेते ॲड.श्री.डी.एस. पाटील व यांच्या ग्रुपच्यावतीने २५०महिलांना तीर्थक्षेत्र यात्रा सहल काढण्यात आली.
तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास हा भाविकांसाठी पर्वकाळ मानला जातो. श्री क्षेत्र आळंदी, देहू, प्रति बालाजी व शिखर शिंगणापूर या धार्मिक स्थळांचे देवदर्शन करण्यासाठी महिलांची तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गावातील साधारण 250 कुटूंबातील माता भगिनींना देवदर्शन घडले. दरम्यान होणारा प्रवास, भोजन इत्यादी सर्व खर्च डी.एस.पी. ग्रुपच्या वतीने करण्यात आला.
यापूर्वीही डीएसपी ग्रुपचे वतीने अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविलेले असून अशाप्रकारच्या सहलीचा उपक्रम तालुक्यात पाहिलाच असल्यामुळे त्याचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे. देवदर्शनाला निघण्यापूर्वी कौठाळी येथील भैरवनाथ चौकामध्ये श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा वाढदिवस साजरा करून प्रवासासाठी निघणाऱ्या ट्रॅव्हल्स व वाहनाचे पूजन अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.