छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वाटीने ११६ जणांनी रक्तदान करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिवप्रतिमेचे पूजन माजी सैनिक संभाजी गुंड , जोतीराम ढेकळे, रामहरी व्यवहारे, बाळासाहेब शेवाळे, चंद्रकांत दशरथ, दत्तात्रय,सुधाकर माने आदीच्या हस्ते करण्यात आले, यावेळी लोकनेते साखर कारखान्याचे संचालक मदनसिंह पाटील, माजी सरपंच अॅड.राजाबापू पाटील, शैलेंद्र पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य रविराज पाटील, डॉ.आप्पासाहेब चव्हाण, खासेराव पाटील, जे.के.गुंड, बाळासाहेब गुंड, अॅड.अमरसिंह पाटील, डॉ.मनोज पाटील,प्रमोद गुंड ,विजय गुंड, आनंद विभूते, दादा केदार, कुर्मदास गावडे, संतोष गावडे, हनुमंत गावडे आदी मान्यवरांसह प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत पाटील, मानसिंग पाटील प्रा. पृथ्वीराज पाटील, सनिराज पाटील, सागर पाटील , धिरज पाटील,, हेमंत पाटील, रुपेश पाटील, शंतनु पाटील, धवल पाटील, सज्जन,गुंड ,पिंटू सुळे, विनय शेळके, विठ्ठल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवशंभो ब्लड बँक मोहोळ यांचे मदतीने रक्तदान शिबीर संपन्न झाले. डॉ.राहूल देशपांडे, सानिया शेख,अक्षता शिंदे, मनिषा गाडे, अक्षय सानप, अमर कदम आदींकडून हे शिबीर यशस्वी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर माने (गुरुजी) यांनी केले तर आभार अनिकेत पाटील यांनी मानले.