छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ह.भ.प.युवा कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचे भव्य कीर्तन सोहळा तसेच विविध क्षेत्रातील कोरोना काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मोडनिंब व मोडनिंब परिसरातील डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी, मेडिकल असोसिएशन,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,व पत्रकार या सर्वांचा सन्मानसोहळा देखील पार पाडला.
विशेष म्हणजे स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था ही कोरोना काळामध्ये अनेक उपाय योजना व संकल्पना राबवून ही संस्था कार्य करीत असतात. या संस्थेमार्फत व वैभव अण्णा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी अशा अनेक समाजोपयोगी तसेच विविध नवनवीन कलावंत व कलाकार यांना एक प्रकारची ओळख निर्माण करण्यात अग्रेसर ठरले आहे. तसेच वृक्षारोपणही असेल असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले जातात.
या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते माननीय श्री संजय बाबा कोकाटे, सूनील बाप्पा मोरे, टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब, माढा तालुकाअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास दादा तोडकरी, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नागनाथ ओहोळ, मोडनिंब ग्रामपंचायतचे सरपंच मीनाताई शिंदे, बावी ग्रामपंचायत माजी सरपंच मुन्नाराजे मोरे, आष्टी गावचे सरपंच डॉक्टर अमित व्यवहारे, तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
विकी(बाबा)मोरे, वैभव रेपाळ, सुरज सूर्वे, सागर टोंगळे, अमोल सरडे, अजय पवार, राकेश शिंदे, करण राऊत, गणेश साळुंखे, श्रीकांत मोरे, अमित(बापू)मोरे, महेश काटकर, आकाश दरेकर, अजय साळुंखे, तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माननीय श्री वैभव आण्णा मोरे मित्र परिवाराचे मोलाचे योगदान लाभले.
ह्या कार्यक्रमाचे आयोजक श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था व सोलापूर जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख वैभव अण्णा मोरे व मित्रपरिवार मोडनिंब यांनी आयोजित करण्यात आले होते.