मोडनिंब येथील मा.वैभव आण्णा मोरे मित्र परिवार व श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि २५ फेब्रुवारी सांय.७ वाजता शिवलीलाताई पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले असाल्याची माहीती मा.वैभव आण्णा मोरे यांनी दिली.
मोडनिंब येथील संगनबसवेश्वर कन्या प्रशालेच्या मैदानात हा किर्तन सोहळा संपन्न होणार असून या किर्तन सोहळ्या प्रसंगी विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व कोविड काळात काम केलेल्या सरकारी डाॕक्टर्स,मेडिकल,ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी,आशा वर्कर्स,बँक कर्मचारी,पोलिस कर्मचारी,पत्रकार,न्यायाधिश व महिलांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.
तरी या किर्तन सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मा.वैभव आण्णा मोरे व श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.