पंढरपूर येथील आज मा-केंद्रीय मंत्री, देशातचे नेते, आदरणीय श्री. शरचंद्रजी पवारसाहेब यांनी आज दि. २७/०४/२०२४ रोजी पंढरपुरातील सुसज्ज अशा डॉ. निकमस ट्युलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर येथे सदिच्छ भेट दिली.
तसेच याप्रसंगी नव्याने सुरु केलेल्या अद्ययावत ट्यूलिप सी.टी. स्कॅन सेंटर उद् घाटन मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेतब यांचे शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. प्रशांत निकम (ORTHOPAEDICS SURGEON AND JOINT REPLACEMENT SURGEON)
यांनी ऑर्थोपेडीक या वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक “ज्वॉइंट रिप्लेसमेंट व ऑथोस्कोपी उपचार यामध्ये केलेल्याफेलोशिप १) थेसाली यूनिव्हसिटी, ग्रीस २) एन. एच. एसट्रस्ट, इंग्लंड 3) क्रिसक्लिनिकम, जर्मनी ४) यूनिव्हरसिटी ऑफ मिलान इटली ५) सेंट जॉर्ज हॉस्पिटल, फ्रान्स येथे उच्चशिक्षीत फेलोशिपबद्दल अभिनंदन केले व त्या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग रुग्णसेवेत व्हावा याबद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ. निकमस ट्यूलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक आय. सी. यु. विभाग, सुसज्ज इमर्जनसी विभाग जॉईट-रिप्लेसमेंट व ऑथॉस्कोपी विभाग, सिटी स्कॅन विभाग, पॅथोलॉजी विभाग, फिजीओथेरापी विभाग व इतर सर्व सुविधांची मा. श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी माहिती घेवून रुग्णसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी श्री. विठ्ठल सह कारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. अभिजित पाटील, मा. श्री. नागेश फाटे मा.श्री. दिनकरबापू कदम, मा. श्री. संतोष कोकाटे, पंढरपुर मधील डॉक्टर्स, हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व सर्व स्टाफ उपस्थित होते.