तानाजी सावंत यांनी 2015मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झाले. राजकारणाबरोबरच त्यांची खरी ओळख ही खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट असल्याचे दिसून येते.
तानाजी सावंत यांचा उस्मानाबाद जिल्ह्यात असलेली पकड आता सैल होत आहे. शिवसेनेत असताना त्यांच्यावर टीकाही होत होती. कोणतेही मोठे आंदोलन न करता शिवसेनेत सध्या त्यांना मोठे स्थान आहे.
तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडखोरी केल्यानंतर मात्र त्यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. बंडखोरीच्या कारणामुळे शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील बालाजीनगर परिसरातील त्यांचे कार्यालयही फोडण्यात आले होते.
तानाजी सावंत यांनी बंडखोरी केल्यानंतरही त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. शिवसैनिकांनी त्यांच्यावर
तानाजी सांवत हे मूळ शिवसैनिक नाहीतच.
तानाजी सावंत कळीचा नारद असून या गद्दाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे याची सुरुवात पुण्यापासून करत असल्याचा इशारा त्यावेळी शिवसैनिकांनी दिला होता.त्यामुळे शिवसैनिक नाहीत तर मग तानाजी सावंत आहेत कोण? तर मूळ शिवसैनिक नसून ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले एक नेते आहेत.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच त्यांनी आपल्या वक्तव्यांतून वादच निर्माण केले होते. त्यामुळे तानाजी सावंत माध्यमांमध्ये नेहमीच चर्चेत राहिले आहेत.