दयावान ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लखन चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मध्ये जुनी वडार गल्ली (सरगम चौक) या ठिकाणी 23/4/2023 सकाळी 9:30 मिनिटांनी रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने दयावान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नवनवीन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रुजवणे बाबत जागृती करणारा हा पंढरपुरातील रक्तदानाचा हा उपक्रम.
राज्यात होणाऱ्या रक्ताचा तुटवडा ही गरज ओळखून दयावान ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यातील तसेच राज्यातील युवक,युवती नागरिक,महिला व विविध समाज घटकांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं असे आवाहन देखील दयावान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आला आहे.
सकाळी 9:30 मिनिटांनी या शिबिराचा शुभारंभ असून पंढरपूर मधील अनेक दिग्गज नेते व मान्यवरांची उपस्थितीने हा सोहळा संपन्न होणार आहे.