मराठी अभिनेता अक्षय वाघमारे याचं लग्न अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी च्या मुलीशी पार पडलं अक्षय बद्दल फारच कमी जणांना माहीती आहे अक्षय वाघमारे हा मराठी सिनेसृष्टीत ले दिग्गज कलाकार दादा कोंडके यांच्या नातू आहे फारच कमी जणांना हे माहित आहे की अक्षय दादा कोंडके यांच्या बहिणींचा नातू आहे.
या नात्याने दादा कोंडके अक्षय चे आजोबा होतात दादा कोंडके यांचा नातू ते डॅडीचा जावई असा अक्षय चा प्रवास साधा आणि सरळ नव्हता अक्षयने कम्प्युटर सायन्स मध्ये मास्टर केले आहे सोबतच तो मॉडलिंग देखील करत होता अखेर त्याने दादा कोंडके यांच्या घराची परंपरा राखत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर बनवण्याचा निर्णय घेतला दादा कोंडके यांचा नातू असला,
तरी त्याला आपलं नाव कमवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली लहान-मोठे चित्रपट केल्यानंतर अखेर त्याला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली सोनी मराठी वरील ती फुलराणी मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली या मालिकेपासून तो ओळखला जाऊ लागला सोबतच या काळात फतेशिकस्त या सिनेमातून झळकला 5 वर्षांपूर्वी अक्षय ची योगिताच्या भावा च्या माध्यमातून तिच्या सोबत ओळख झाली.
पाच वर्षांपूर्वीच योगिताच्या भावांना बहिणीसाठी अक्षयचा हात मागितला होता पण अक्षयने त्यावेळी करिअरसाठी लग्नाला नकार दिला मात्र याची पुसटशी कल्पनाही योगिताला नव्हती पुढे सामाजिक कार्याच्या निमित्ताने योगिता आणि अक्षयची मैत्री झाली आणि अचानक एक दिवस अक्षय योगिताला लग्नासाठी प्रपोज केल.
मात्र योगिता मम्मी आणि डॅडी च्या परवानगीशिवाय लग्न करणार नसल्याचं सांगितलं यावर अक्षयने योगिताच्या आईला विचारलं आणि तिथून लग्नाला परवानगी मिळाल्यानंतर साखरपुडा च्या तयारीला सुरुवात झाली या साखरपुडा बद्दल अरुण गवळी यांना माहिती नव्हती साखरपुडा झाल्यानंतर अक्षय ने पत्र लिहून अरुण गवळी ना साखरपुडा बद्दल ची माहिती दिली.
साखरपुड्यात इतकी गुप्तता पाळण्यात आली होती की पंचवीस वर्षे अक्षय च्या घरासमोर राहणाऱ्या शेजाऱ्यांना देखील अक्षय कोणाच्या मुलीशी लग्न करतोय याची पुसटशीही कल्पना नव्हती पुढच्या काही वर्षात योगिता आपल्याला राजकारणात दिसेल तर अशा या आगळ्यावेगळ्या प्रेम कहानी ला आज पासून सुरुवात झाली आहे.