समाजातील दृष्टीहीन, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनुविकलांग व कुष्ठरोग, अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यकडे पाहून त्यांच्यामधील असलेले सुप्तसामर्थ्य विकसित करून त्यांना समाज जीवनाच्या सर्वअंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय तसेच इतर विविध विभागातर्फे कल्याणकारी योजनाही राबविण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून, पंढरपूर तालुक्यातील पेहे गावामध्ये सर्व दिव्यांगांना दिव्यांग अत्योंदय शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले.
दिव्यांगाची कोरोना Corona काळानंतर परिस्थिती बिकट झालेली असून, दिव्यांगाना आपल्या अन्नपुरवठा योजने मधून अंत्योदय शिधापत्रिकाचा लाभ मिळत नसल्याने सप्टेंबर २०२० मध्ये महाराष्ट्र Maharashtra शासन निर्णयान्वये दिव्यांगांना अंत्योदय रेशनकार्ड देण्याचे परिपत्रकही जारी करण्यात आले होते.
या गावातील सर्व दिव्यांग बांधवांना शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले. यावेळी पेहे गावातील ग्रामसेवक हाडपे साहेब, सरपंच सोमनाथ गायकवाड, धनाजी गायकवाड, शंकर शिंदे, नामदेव नायकुडे, कपिला पाटील, विठ्ठल पाटील, नागनाथ वाघमारे, मोहम्मद पठाण, प्रकाश बंडगर, सिद्धेश्वर भंडलकर, व गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते सर्वांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी धनाजी गायकवाड यांनी दिव्यांगांना जेवढ्या सुखसुविधा ग्रामपंचायतीकडून देता येतील तेवढे प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. या दिव्यांगाच्या सर्व योजना पासून एकही अपंग व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही याचीही खबरदारी घेऊ असेही सांगितले. यावेळी धनाजी गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.