पंढरपूर मध्ये सुमारे दोन वर्षानंतर आता आषाढीवारी भरली असता रसीकप्रेक्षकांसाठी राज्यातच नव्हे तर भारतात गाजलेली “सुपरस्टार सर्कस” सरगम टॉकीज शेजारील मैदानात सोमवार दि ४ जुलै पासून चालू झाला आहे, अशी माहिती या सर्कसचे संचालक श्री प्रकाश महादेव माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवार दिनांक ४ जुलै रोजी सुरु होणार असुन माजी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले,माजी उपनगराध्यक्ष नागोश भोसले,शिवसेना नेते जयवंत माने व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. यामध्ये जिम्नॅस्टिक कसरती आणि चित्तथरारक विविध धाडसी खेळ पहावयास मिळणार आहेत.
पंढरपूरात दाखल झालेल्या या सुपरस्टार सर्कसमध्ये नेपाळ, आसाम, केरळ, तामिळनाडु, गुजरात, महाराष्ट्रसह विविध राज्यातील कलाकारांचा समावेश आहे. सदर सर्कसमध्ये विविध प्रकारचे नाविन्यपुर्ण व नेत्रदिपक प्रयोग सादर केले जाणार आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा सह विविध जिल्ह्यातही सर्कस नावजलेली सर्कस म्हणून ओळखली जाते. या सुपरस्टार सर्कसमध्ये एकूण ८० कलाकार असून हे सर्व कलाकार विविध कला व प्रयोग सादर करणार आहेत.
यात्रा काळात सर्कस येणे ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. तुफान वेगाने होणारी मोटारसायकल जम्प, मृत्यूगोल, विविध जिम्नॅस्टिक प्रकार अशी कधीही न पाहिलेली कला पहावयास मिळणार आहे, पंढरपूर येथे ही सुपरस्टार सर्कस १ महिना असेल, दररोज ३ शो दाखविले जाणार आहेत, कायद्याच्या चौकटीत राहून विविध नियम पाळावे लागतात, लहान मुले ,जंगली प्राणी, पाळीव प्राणी, पशु-पक्षी यांच्या कला सादर करता येत नाहीत, वाघ, सिंह, हत्ती, जिराफ असे प्राणी सर्कशीत असल्याने ती पाहण्यास गर्दी व्हायची, तसा प्रेक्षकवर्ग आता लाभत नाही अशी खंत संचालक प्रकाश माने यांनी व्यक्त केली.
दरम्यान कोरोना महामारीच्या काळात या कलाकार लोकांचे फार हाल झाले होते. सर्कस मध्ये काम करणाऱ्या कलाकारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले होते. याबाबत सर्कसचे मालक श्री प्रकाश माधव माने यांनी सुद्धा ही बाब स्पष्ट केली आहे. कोरोना काळात आम्हा कलाकारांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे, हे नुकसान कधीही भरून न येणारे असून यामध्ये आम्हाला उपजीविका करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागली होती. लॉकडाऊन झाल्यानंतर सर्कस बंद झाली होती. दरम्यानच्या काळात मी माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन महामारीचा सामना केला आहे. या दरम्यान सर्कस बंद असताना त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न देखील गंभीर बनला होता अशा परिस्थितीत काही चांगली माणसे देवासारखी भेटत गेली. ज्यांनी लॉकडाऊन नंतरच्या काळात आम्हाला मोलाचे सहकार्य केले. ज्यामुळे कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लागला.
सर्कस पाहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत दिली जाणार आहे. सदर सर्कस पाहण्यासाठी पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी एक वेळ अवश्य यावे असे आवाहन श्री प्रकाश माधव माने यांनी केले आहे.