सोलापूर जिल्हयाचे भाजप सरचिटणीस श्री धैर्यशील मोहिते पाटील उर्फ भैय्यासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कसलाही डामडोल न करता खर्चाला फाटा देत अकलूज येथील समाजसेवक तसेच एस बी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण तात्या बंदपट्टे यांनी पंढरपूरातील शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा येथे विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजनाचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी विद्यार्थिनी धैर्यशील उर्फ भैय्यासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना व वाढदिवसगित साजरी करून शुभेच्छाही देण्यात आले.
प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित स्पर्श मायेचा पालवी आपुलकीची म्हणजेच पालवी येथे जाऊन सर्व बालकांना भैय्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सफरचंद व चिकूचे फळे वाटप करण्यात आले त्यानंतर राम कृष्ण हरी वृद्धाश्रम येथे मिष्ठांन भोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या वयोवृद्ध आश्रमामधील लोकांनी भैय्यासाहेबांना सुख समृद्धी व दीर्घायुष्य लाभण्याचे आशीर्वाद देण्यात आले त्यानंतर पुन्हा नवजीवन निवासी अपंग शाळा असलेल्या पंढरपूर येथील विद्यार्थ्यांना एक आगळावेगळा स्नेहभोजनाचा म्हणजेच विद्यार्थ्यांना नॉनव्हेज भोजनाचा आस्वाद देण्यात आला.
पहिल्यांदाच पंढरपुरातील अंधशाळेतील बालकांना निवासी अपंग शाळा असलेल्या बालकांना आश्रमातील वयोवृद्ध मातापित्यांना तसेच पालवी येथील बाल मुलांना स्नेहभोजन व फळे वाटप करून एक प्रकारे समाजात वाढदिवसाचा एक आगळा वेगळा आदर्श एस बी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बंदपट्टे यांनी आदर्श घालून दिल्याने पंढरपुरातील प्रथमच या सर्व बालकाश्रम व वयोवृद्ध आश्रमांना मिष्ठांन भोजन व फळे वाटप केल्याने सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी एस बी ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.