श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि विठ्ठल प्रतिष्ठान यांच्यामार्फत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेले शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या धगधगत्या इतिहासाचे व्याख्यान आयोजन केले आहे. येत्या १४मे रोजी सायं ७वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर (शिवतीर्थ) येथे होणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटलाचा इतिहास समाजापुढे तरुण युवा पिढीसमोर जागर राहावा त्यातून प्रेरणा घेऊन आपल्यामध्ये आत्मसात करावी यातूनच युवा पिढी यशस्वी घडेल असा विश्वास व्यक्त केला आहे.