थंडीच्या कडाक्यात देखील आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी,निघालेल्या शेतकऱ्याला दुचाकीला धडक दिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आले आहे.
पंढरपूर परिसरातील सगळेच रस्ते रुंद आणि सिमेंटचे बनले आहेत. त्यामुळे लहान मोठी सगळी वाहने प्रचंड वेगाने धावत असतात, त्यातच पंढरपूर कुर्डूवाडी हा रस्ता ओबडधोबड झाल्याने हा मार्ग मृत्यूचा महामार्ग बनला आहे. पंढरपूर कुर्डूवाडी हा रस्ता जणू काही अपघात होण्यासाठीच असा तयार केला आहे, असा प्रश्न पडतो. या रस्त्यावर डांबरी रस्त्याच्या साठ पटीने मृत्यूचे प्रमाण या मार्गावर झाले आहे.भल्या सकाळी पहाटे झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला.
पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव येथील पांडुरंग बळीराम शिंदे वय वर्ष 62 या शेतकऱ्याला दुचाकीने धडक दिली असता जागेवरच मृत्युमुखी पडले शिंदे हे भल्या पहाटेच आपल्या शेताकडे पिकांना पाणी देण्यासाठी लवकर उठून शेताकडे जात असताना पाठीमागून येत असलेल्या दुचाकीने उडवले थंडीचे दिवस आणि पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्याच्या आसपास कोणीही नव्हते पांडुरंग शिंदे त्यांच्यामागून त्यांचे चुलत बंधू चंद्रकांत महादेव शिंदे हे देखील आपल्या शेतात निघाले होते ते पाठीमागून येत असल्याने पांडुरंग शिंदे यांचा अपघात झाल्याचे पाहिले तातडीने अन्य नातेवाइकांना या घटनेची माहिती देऊन कुटुंबे घटनास्थळी दाखल होऊन पांडुरंग शिंदे यांना पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले पांडुरंग शिंदे यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा रक्तस्त्राव भरपूर झाल्याने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.
या अपघातप्रकरणी सत्यवान बळीराम शिंदे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार, योगेश महादेव सुर्वे राहणार आष्टी, तालुका मोहोळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.