महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात उत्साहात साजरी करण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील आंबे,सरकोली,ओझेवाडी या गावामध्ये उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते शिवजयंती साजरी करण्यात आली, यावेळी आंबे गावातील मुख्य चौकात असलेल्या भगवा ध्वजाची पूजा करत गावातील ग्रामपंचायतीमध्ये महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून गावच्या विकासाबाबत चर्चा केली.
यानंतर उद्योजक राजू खरे यांनी गावातील असलेल्या मुख्य भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या जयघोषाने परिसर दणाणून गेला. तर गावामध्ये चौका चौकात शिवजयंतीचे व्यासपीठ लागले असून सर्वत्र भगवा ध्वज लागल्याने वातावरण भगवेमय झाले होते.
त्यानंतर राजू खरे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्रित करून ‘स्वराज्याची’ स्थापना केली, सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर सामर्थ्यशाली आणि प्रगतशील राज्य उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळते यातून माणूस सामर्थ्यवान बनतो, एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना विविध धर्मातील लोकांना सोबत घेत स्वराज्याची स्थापना केली.तसेच पुढेही खरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता असल्याचा देखील बोलले गेले.
यानंतर स्थानिक शाळेतील व प्रशालेतील विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त करत जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.