श्री. दत्त शिवजन्मोत्सव सोहळा समिती व माजी नगरसेवक बालाजी मलपे मित्र परिवाराच्या वतीने पंढरपूर शहरातील इसबावी मलपे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी जयंतीच्या औचित्याने सामाजिक बांधिलकी जोपासत व महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेलेला कमी रक्त साठा व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान शिबिराची गरज लक्षात घेऊन सार्वजनिक हित जोपासत शिबिरांचे आयोजन करण्याच्या दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बालाजी मलपे मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करूण पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरास रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने, तसेच या भागातील सर्व आजी माजी नगरसेवक,पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात सर्व नागरिक उपस्थित राहिल्याने आयोजक नगरसेवक बालाजी मलपे मित्र परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.