पंढरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जनतेची बेसूमार लूट.. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची होतेयं मागणी..!

पंढरपूर येथील असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांकडून बेसुमार लूट सुरू असल्याचा आरोप नागरिकांनकडूनच होत आहे. पंढरपूर तालुक्यातील व शहरातील नागरिकांना खरेदी-विक्री व इतर व्यवहाराकरिता दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागते. सध्या दुय्यम निबंध कार्यालयात नोंदणी व्यवहार ऑनलाइन पद्धतीने चालत आहे. याकरिता पूर्वे डी-डी रजिस्ट्रेशन फी बँके मार्फत काढावी लागत होती, मात्र जेव्हापासून ऑनलाईन पद्धत सुरू झाली तेव्हापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची पावती काढावी लागत आहे. मुद्रणकाच्या बाबतीतही तसेच आहे सध्या तीस हजारांच्या वर मुद्रांक नसल्याने ते सुद्धा ऑनलाईन रक्कम भरून त्याचीही पावती काढावी लागते. एक प्रकारे ग्राहकांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अत्यंत सुटसुटीत आहे. मात्र ज्या ग्राहकांना संगणकाचे ज्ञान असेल अशाच ग्राहकांनाही पद्धत कळते, त्यामुळे त्यांचे काम हे सहज होते तथापि ज्यांना संगणकाचे कोणतेही ज्ञान नाही अशा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे ऑनलाइन पद्धत डोकेदुखी ठरले आहे. ज्या ग्राहकांना संगणकाचे ज्ञान नाही अशा ग्राहकांची या कार्यालयात लूट होत असल्याची ओरड होत आहे.

या कार्यालयात अनेक नागरिक त्रागा करतात, मात्र दुय्यम निबंधकाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात अशी नागरिकांची देखील ओरड आहे. या कार्यालयात दस्त नोंदणीसाठी तालुक्यातील सर्वच नागरिकांना यावे लागते कर्मचाऱ्यांच्या अधिकारांच्या कुचराईमुळे कामात दिरंगाई जाणूनबुजून करत असल्याचेही आरोप केले गेले. तसेच तासंतास उभे राहून वाट पाहावी लागते.

पंढरपूर शहर व तालुका खरेदी-विक्री व्यवहारात अग्रेसर आहे त्यातून शासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूलही मिळतो. मात्र नागरिकांना रजिस्टर फी काढतानाही ऑनलाइनची फी द्यावी लागत असल्याने त्यामुळे एका दस्तऐवजाचा नावाखाली हजारो रुपये उकळले जात असल्याची माहिती नागरिकांनीच दिली आहे. दुय्यम निबंधकांनी कार्यालयाच्या परिसरात ऑनलाइन रजिस्ट्रेशन फी चे पैसे किती घ्यायला पाहिजे याबाबतही सूचनाफलक कुठेही लावले नसल्याचे दिसून येते याचाच फायदा घेत दुय्यम निबंधकाच्या कार्यालयातून ज्यादा पैसे उकळण्यात येत असल्याची ओरड ग्राहकाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे आता महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी दुय्यम निबंधकाच्या कार्यालयातून चाललेला खुलेआम लूट थांबण्यासाठी प्रयत्न करतील का हे देखील पहावे लागणार..!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *