भारताची दक्षिण कशी असा अध्यात्मिक आणि सांप्रदायिक वसा आणि वारसा लाभलेल्या पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांची सर्व शासकीय व प्रशासकीय कामे एकाच छताखाली होण्यासाठी गेली अनेक वर्षे निधी मंजूरीच्या प्रतीक्षेत असलेल्या व पंढरपूर शहरांमध्ये साकार होणाऱ्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ३२ कोटी, शहरातील विविध रस्ते विकास प्रकल्पसाठी १०४ कोटी त्याचबरोबर पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी १०८कोटी व श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती विकास आराखड्यासाठी १५० कोटी असा एकूण ३९५ कोटींचा ऐतिहासिक निधी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याने पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव व नगरपरिषद मुख्याधिकारी जाधव यांच्या हस्ते आमदार समाधान आवताडे यांचा अभिनंदनपर करण्यात आला आहे.
देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर शहराचे तीर्थक्षेत्र वैभव विविध मूलभूत व पायाभूत विकास कामांच्या आणि निधीच्या रूपाने भक्कम करण्यासाठी तसेच विकासाच्या रूपाने परिवर्तनशील पंढरपूर शहराच्या निर्मितीसाठी आमदार आवताडे यांनी वरील विकास कामांच्या निधी मंजुरीसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या मागण्यांचा रेटा लावून धरला होता. आमदार आवताडे यांच्या या मागण्यांची दखल घेऊन मंजूर झालेल्या या निधीबद्दल शहरातील स्थानिक नागरिकांनी व प्रशासकीय यंत्रणांनी आमदार महोदय यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
मंजूर झालेल्या वरील निधीतून पंढरपूर शहरातील अंतर्गत विविध रस्ते, पाणीपुरवठा विकास कार्यक्षेत्रातील निरनिराळ्या पाणी योजना व झोपडपट्टी भागातील नागरिकांना मूलभूत व पायाभूत विकास योजना नेण्यासाठी धोरणात्मक प्रगतीची चाके आणखी वेगाने गतिमान होणार असल्याचे चित्र शहरवासी नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे.