पंढरीत हजारोंच्या उपस्थितीत साजरा होणार आंतरराष्ट्रीय योगदिन..!

21 जून रोजी पंढरपूर येथील रेल्वे मैदानात 8 वा आंतरराष्ट्रीय योगदिन हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी हजारोंच्या संखेने विद्यार्थी ,शिक्षक ,सर्व आध्यात्मिक प्रभुती,विविध संस्थांचे पदाधिकारी,आधिकारी व नागरीक उपस्थित राहणार असून आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या या महोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे अवाहन मा.आ.श्री.प्रशांत परिचारक,पतंजली योग समितीच्या महाराष्ट्र प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे, युवकनेते प्रणव परिचारक यांनी केले आहे.

पंतप्रधान माननिय नरेंद्रजी मोदी यांच्या मानवतेसाठी योग या तत्वास अनुसरुन आयुष मंत्रालय भारत सरकार,श्री.पांडुरंग सह.साखर कारखाना , भारतील रेल व पतंजली योग समितीच्या वतीने या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या महोत्सवाचे संयोजन केले जाणार आहे.यामध्ये पंढरपूर परिसरातील सर्व शैक्षणिक संस्था,योगसंस्था,आध्यात्मिक संस्था,सामाजिक संस्था,क्रीडा मंडळे,महिला मंडळे,युवक मंडळे मोठ्या संखेने सामिल होणार आहेत.

माननिय प्रधानसेवक श्री.नरेंदजी मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र महासभेत 2014 मध्ये 21जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषीत केला गेला. योग हा आपल्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसाचा अविभाज्य अंग असल्याने योगाची जगभराची मान्यता ही आपल्या देशासाठी अभिमाची बाब आहे.आयुष मंत्रालय हे आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निरिक्षणासाठी नोडल मंत्रालय आहे.दरवर्षी आंतरराष्ट्रीय सामुहिक योग प्रात्यक्षिके जगभरात साजरी होतात , ज्यांचे नेतृत्व माननिय पंतप्रधान स्वतः करतात.

भारतातील प्रमुख धार्मिक मंदिरे,ऐतिहासिक स्थळे
अशा 75 ठिकाणी 8 वा आंतरराष्ट्रीय योगदिन आयोजित करण्याचा मानस माननिय पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमत व्यक्त केली होता.जेणे करुन ही स्थळे जागतिक पर्यटनाची प्रमुख केंद्र व्हावीत.ह्यासाठीच परमपुज्य स्वामी रामदेवजी महाराज यांच्या पतंजली योग पिठास ही जबाबदारी दिली. यासाठीच पंढरपूर या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन केल्याचे पंतंजली योग समितीच्या महाराष्ट्र महिला प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे यांनी सांगितले.

21 जून रोजी रेल्वे मैदान पंढरपूर येथे सकाळी 6 वाजता आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या महोत्सवाची सुरवात होणार असून हजारोंच्या संखेने शिबीरार्थी पांढर्या पोशाखात उपस्थित राहणार आहेत.सोबत येताना पाण्याची बाटली,सतरंजी,योग मॕट,रुमाल आणण्याचे अवाहन करण्यात आले आहे.योग महोत्सव स्थळी वैद्यकीय सेवा,अॕम्ब्लूलन्स व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.शहरातील विविध ठिकाणी महोत्सवापूर्वी योग शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.रविवारी सायकल्स क्लबच्या रॕली वतीने व सोमवारी शोभायात्राही होणार आहे.


यावेळी पतंजलीचे कोषाध्यक्ष भुतडा,महिला संरक्षक रत्नाताई माळी ,प्रशांत वाघमारे ,सुभाष मस्के,प्रणव परिचारक मित्र मंडळ,पांडुरंग परिवार,पतंजलीचे योगशिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *