पंढरपूर –
पर्यावरणाचा समतोल आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सायकल चालविणे हा उत्तम पर्याय आहे या व्यायामामुळे स्वतः आणि देशाची देखील आर्थिक बचत होण्यास मदत होते असे प्रतिपादन युवा नेते ऍड प्रणव परिचारक यांनी केले.
पंढरपूर सायकलर्स क्लब व अरिहंत ऑप्टिकल यांच्या विशेष प्राविण्य प्राप्त सायकलपटूचा परिचारक यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक अरिहंत कोठाडिया, सारिका कोठडीया, जेंष्ठ पत्रकार सुनील उंबरे, ज्येष्ठ विधिज्ञ अमर देशमुख उपस्थित होते.
गेल्या वर्षभरामध्ये पाच हजार पासून वीस हजार किलो मीटर पर्यत सायकलिंग करणाऱ्या पंढरपूर मधील सायकलपटूचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
त्याच बरोबर सायकल वरुन भारत भ्रमण केल्याबद्दल दिगंबर भोसले व गणपत सुंदराबाई गोपीनाथ पवार यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. पंढरपूर सायकल क्लबचे सदस्य सुनील उंबरे यांच्या फोटोला देशपातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री परिचारक यांचे हस्ते गौरविण्यात आले.
२०,००० km सायकलिंगसाठी डॉ. हणमंत दिक्षीत, संतोष कवडे, श्रीकांत बडवे, सचिन राऊत यांचा सन्मान करण्यात आला. १०,००० km ,५,००० km सायकलिंग करणाऱ्या सायकलपटूचा सन्मान करण्यात आला. विशेष करून श्री व सौ चंद्रराव व श्री व सौ अष्टेकर या दोन्ही पती-पत्नी यांचाही सायकलींच्या क्लब तर्फे सत्कार करण्यात आला.
या समारंभात पंढरपूर सायकलर्स क्लबला सर्व प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासन अँड प्रणव परिचारक यांनी दिले.
पंढरपूर शहर आरोग्यदायी बनवण्यासाठी सायकल चालवा निरोगी राहा असा संदेश त्यांनी दिला. यासाठी मी स्वतः ही पंढरपूर सायकलर्स क्लबच्या परिवारात सहभागी झालो आहे असे परिचारक म्हणाले. यावेळी पत्रकार सुनील उंबरे व सारिका कोठाडीया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखाताई चंद्रराव तर प्रास्ताविक प्रसिद्ध व्यापारी प्रकाश शेटे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार महेश भोसले यांनी मानले.