नळी येथे विविध विकास कामांचे मा.पवन (भैय्या) महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न!
पंढरपूर तालुक्यातील नळी या गावात जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत नळी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून खासदार मा.धनंजय महाडिक यांच्या सहकार्यातून तसेच मा.पवन (भैय्या) महाडिक यांच्या अथक परिश्रमातून जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील नळी येथे विविध विकास कामे मंजूर केली आहेत.
नळी या गावातून येण्या जाण्यासाठी नागरिकांना वयवाटीला रस्ता नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता मा.पवन (भैय्या) महाडिक यांच्या माध्यमातून रस्ते मंजूर झाल्याने सर्व सामान्य शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नळी गावाच्या विकासासाठी सदैव मी तत्पर राहणार असल्याचे मा.पवन (भैय्या) महाडिक यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले.
यामध्ये नळी ते कोळीवाडा रस्ता १५ लाख रुपये, नळी ते आंबे चिंचोली रस्ता २० लाख रूपये, नळी गावातील दलित वस्ती येथील पेव्हिंग ब्लॉक साठी ८ लाख रुपये, तसेच भिमानगर येथील पेविंग ब्लॉक साठी ५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
नळी या गावासाठी तब्बल ४८ लाख रुपयांचा निधी मा.पवन (भैय्या)महाडिक यांनी मंजूर करून आणला होता तसेच या विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे.
यावेळी सरपंच कडाप्पा कांबळे, आप्पा भोई, पैलवान संजय घोडके, वस्ताद सत्यवान घोडके, नाना भोई,अनिल घोडके, आप्पा डांगे, सिद्राम बेद्रे, त्रिंबक घोडके, दादा भोई, बापू लोंढे, मंगलदास घोडके, संतोष भोई, सचिन आठवले, साहेबराव घोडके, संताजी भोसले, आकाश आरकीले,चेतन साठे, शेखर आरकीले, आकाश बंदपट्टे ,प्रकाश शेंडगे, विशाल पाटील,प्रकाश मोरे, बालाजी गायकवाड व सर्व पदाधिकारी समर्थक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.