तालुक्यात पाणी आणले म्हणून एकीकडे सत्कार घ्यायचे आणि दुसरीकडे मात्र शेतकरी बाधवांना पाण्यापासून वंचित ठेवायचे असा तुमचा सध्या उद्योग सुरु आहे. तालुकावासियांना शास्वत विकासापासून कोसो दूर ठेवले असून सध्या तुमची नुसती बोलबच्चन गिरी सुरु आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, तुम्ही आमदार सर्व सत्तेत असताना सुध्दा तुम्हाला शेतकऱ्यांना आश्वासनाशिवाय काहीही देता येत नाही. तुमचे गणित जनता चांगले ओळखून आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमचा वजाबाकी व भागाकार चांगल्याच प्रकारे करणार आहे. यामुळे तुम्ही आम्हाला गणित शिकविण्याची गरज नाही असे इशारा डॉ.अनिकेत देशमुख यांनी दिला.
आजोबाला जुळलं नाही,ते तुम्हाला कुठं जमायचं नादाला लागू नका , अशी टीका आ. शहाजीबापू पाटील यांनी स्व.गणपतराव देशमुख यांच्यासह डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांच्यावर एक कार्यक्रमात नुकतीच टीका केली होती. याचा खरपूस समाचार डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी घेतला.
डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना पिकविमे मिळाले नाहीत, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे प्रोत्साहन पर अनुदान मिळाले नाही यासंदर्भात आपण विधानसभेत आवाज उठविला नाही. एकही शब्द ही बोलत नाही. हा शाश्वत विकास बाजूला ठेवून पाणी आणल्याचा आव आणून स्वतःचीच पाठ थोपटण्याचा केविलवाणा प्रयत्न तुमच्याकडून सुरु आहे.हा सर्व पोरखेळ सांगोला तालुका उघड्या डोळ्याने पाहत आहे.
स्व.आबासाहेबांनी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून सांगोला तालुक्यातील विकास केलेला आहे.आमचे दैवत स्व.आबासाहेब यांच्या टिका करण्याच्या अगोदर स्वतः आत्मपरीक्षण करा. पाणी कोणी आणले हे दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासह अनेक मंत्र्यांनी अनेक कार्यक्रमात सांगितलले आहे. अर्ज विनंत्या करुन पाणी येत नसते त्यासाठी संघर्ष करावा लागतो हे विद्यमान आमदारांनी विसरु नये. त्यामुळे स्व .आबासाहेब यांच्यावर टीका करणे हे शोभनिय नाही.आबासाहेब यांचे आमच्यावर संस्कार आहेत म्हणून आम्ही आज पर्यंत विरोधकांवर टीका करत नव्हतो. तुम्ही जर आमचे दैवत स्व.आबासाहेब यांच्यावर टीका करणार असाल तर यापुढे आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा डॉ.अनिकेत देशमुख यांनी दिला.