सट्टेबाजी ही अत्यंत वाईट सवय असून, बेकायदेशीर आहे. मात्र सध्या ऑनलाईन सट्टेबाजी दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑनलाईन सट्टेबाजीसाठी कुठलीही कारवाई केली जात नसल्याने, त्यामुळे ऑनलाइन सट्टेबाजी करताना अटी व शर्ती देखील सांगितल्या जातात. कारण सट्टेबाजी हे व्यसन व्यक्तीला कोणतेही पाऊल उचलण्यात भाग पडते. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील समोर आली आहे.
विशाल अहिरवार नावाच्या व्यक्तीने सागर जिल्ह्यातील बिना पोस्ट ऑफिसमध्ये डेप्युटी पोस्टमास्तर म्हणून कार्यरत होता. यामध्ये विशालने फसवणूक केल्याचा आरोप काही गुंतवणूकदाराने केला, तर अहिरवार यांनी कधीही गुंतवणूकदारांचे पैसे जमा केले नसल्याचे पोलिसांना सांगितले. तर अनेक कुटुंबांनी सेविंग केलेल्या पैशातून आरोपी अहिरवार यांनी सट्टा लावला. विशाल हा गेल्या दोन वर्षांपासून सुमारे 24 कुटुंबाच्या लाखो रुपये मधून आयपीएल मध्ये सट्टा लावत होता.
पोस्ट ऑफिसच्या फिक्स डिपॉझिट अकाऊंटमधून विशालने सट्टा लावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तो व्हीसा धारकांना पासबुक द्यायचा व पैसे जमा करण्याऐवजी तो सट्टा लावायचा. आणि जेव्हा लोक पैसे काढण्यासाठी आले असता, त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचे सांगण्यात आले. विशालने निष्पाप कुटुंबाची सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
विशाल अहिरवार यांना यापूर्वीही निलंबित केले गेले होते. बिना सागर जिल्ह्यातील खिमलासा येथे असतानाही त्याने आर्थिक फसवणूक देखील केली होती. त्यामुळे त्याला निलंबितही करण्यात आले होते. विशाल आहिरवार याला सरकारी रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.