प्रथम बौद्ध धम्म परिषदेला उद्योजक राजू खरेंसह सहपत्नीक सौ.तृप्ती (ताई) खरे यांच्याकडून 3000 लोकांसाठी अन्नदानाची सेवा…!

प्रथम बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने मोहोळ मतदारसंघातील व उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे अकोलेकाटी या गावात सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करत रॅलीस सुरुवात करण्यात आली.या रॅलीतून बुद्ध धर्म म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक वाट एकदा का ह्या वाटेवर पाऊल पडले की आपोआप मानवाला जीवनाचा खरा अर्थ कळू लागतो व मृत्यू सुद्धा त्यांना मंगलमय वाटतो असा संदेशही मानवाला दिला गेला.

या बौद्ध धम्म परिषदेला प्रमुख मार्गदर्शक पु.भदंतु-खेम धम्मो महाथेरो,पु.भदंतु-ज्ञानज्योती महाथेरो,पु.भदंतू-डॉ.सम्यक बोधी,पु.भदंतु-धम्मसार,पु.भदंतु-सदानंद,तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मोहोळ विधानसभेचे उमेदवार,उद्योजक व समाजसेवक राजू खरे यांच्यासह सहपत्नी समाजसेविका सौ.तृप्ती (ताई) खरे यांनी भंतीजींना चिवर व धम्मदान करत आपल्या दातृत्वाने संपूर्ण मोहोळ मतदारसंघात प्रचलित असताना या ठिकाणी म्हणजेच धम्म परिषदेला आलेल्या 3000 लोकांना स्वखर्चाने अन्नदानाची सेवा पार पाडली.

यावेळी विजूभाऊ खरे,सोमिनाथ गवळी,ग्रा.पं सदस्य ज्ञानेश्वर गवळी, गोपाळपूरचे सरपंच अरुण बनसोडे,रामहिंगणीचे सरपंच संभाजी लेंगरे,नेपतगावचे सरपंच पांडुरंग परकाळे, गाडेकर सर,सेवालाल नगरचे सरपंच लक्ष्मण, ग्रा.पं.सदस्य विशाल सर्वगोड,उत्तर सोलापूर शिवसेना तालुका प्रमुख उमाकांत करंडे, युवा तालुकाध्यक्ष आकाश गजघाटे,बी.आर.आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे,संजय लंबे,संजय मस्के,राजेश चंदनशिवे,समाधान बाबर,इंद्रजित कांबळे,सचिनकुमार बनसोडे,प्रमोद मस्के आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *