सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वडशिंग गावचे सुपुत्र प्रा. सदाशिव कदम यांची आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून लौकिक असणारी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा.डॉ. सदाशिव कदम यांनी १९९१ ते २००५ या काळात श्रीरामपूर येथील संस्थेत हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत होते.त्यानंतर पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेत आपला कार्यकाळ संपन्न केला. त्यानंतर याआधी बॅरिस्टर पी.जी.पाटील यांच्या आशीर्वादाने पश्चिम बंगालमधील विश्वभारती शांतीनिकेतन विद्यापीठातून यांनी एम.ए.पीएचडीची पदवी घेऊन ते रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होते.
त्यांच्या या जडणघडणीत याआधी रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबर बोर्डाचे चेअरमन म्हणूनही उत्कृष्ट काम केलेले असल्याचे त्यांना याबाबत दांडगा अनुभव आहे, त्यामुळेच प्राध्यापक डॉक्टर सदाशिव कदम यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल मध्ये बिनविरोध सदस्यपदी निवड करण्यात आली. तसेच बॅरिस्टर पी.जी. पाटील,प्राध्यापक एन डी पाटील व प्रा.रावसाहेब शिंदे यांचा सहवास व प्रेमाचा मोठा वाटा असल्याचे नूतन सदस्य कदम यांनी रयत सेवकांकडून सत्कार सोहळ्यादरम्यान यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना असेही म्हणाले की माझ्या निवडीचा बहुमान केवळ माझा नसून संस्थेतील नि:स्पहपणे काम करणाऱ्या प्रत्येक सेवकाचा व त्यांच्या सहकार्यामुळे तसेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, चेअरमन डॉ.अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ काका शिंदे यांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आलेल्या व्यक्तीला ही संधी मिळाल्याने भविष्यात बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराला अभिप्रेत असलेले काम करून संस्थेचा लौकिक वाढवण्यासाठी योगदान देणार असल्याचेही प्राध्यापक कदम यांनी सांगितले.