भैरवनाथवाडी येथे राज्याचे आरोग्य मंत्री आले असता,भाजपा किसान मोर्चा च्या वतीने निवेदन देण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात अनेक एजेटांनी व सिव्हिल हॉस्पिटल मधिल काही कर्मचार्याच्या संगनमताने भरमसाठ पैसे घेऊन अनेक लोकांनी व नोकरदार मंडळी सह काही प्राथमिक शिक्षकांना बोगस अपंग सर्टिफिकेट काढून दिले आहेत. हे सर्टिफिकेट ते शासकीय, निमशासकीय नोकरदार बदली रोखण्यासाठी व शासकीय फायदे करून घेण्यासाठी वापरत आहेत.यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस गिरी झाली आहे. प्रचंड भ्रष्टाचार ही झाला आहे. यामुळे खरे व गोरगरीब अंपगाना मिळणार्या शासकीय फायद्या पासून वंचित राहवे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकाच ठिकाणी कामकरीत एकाच टेबल वर असल्याने मुजोर झाले आहे, असे भ्रष्टाचारी काम करणार्या कर्मचाऱ्यांची चौकशी करावी. काही कर्मचार्यांनी तर प्रचंड माया जमवली असुन अस्या लोकांच्या संपत्तीची पण चौकशी करावी त्यानंतर एक मोठे रॅकेट उघड होणार आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी लोकांवर कार्यवाही करावी व खऱ्या अर्थाने अपंग असलेल्या गोरगरिबांना न्याय द्यावा, असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ना.तानाजीराव सावंत साहेब यांना देण्यात आले.
यावेळी मंत्रीमहोदयानी चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.यावेळी शिवाजीराव सावंत सर,लक्ष्मणराव धनवडे ,माऊली हळणवर महाविर देशमुख ,शिवाजी बाबर ,दत्ता खांडेकर ,ज्ञानेश्वर गुंडगे बप्पा धनवडे,नानासाहेब माने ,बापु वसेकर ,यांचे सह नारायण चिंचोली व ईश्वर वठार येथिल ग्रामस्थ उपस्थित होते.