भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप सुभाष माने यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी ,युवक नेते प्रणव परिचारक, तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे ,सोमनाथ अवताडे,बादलसिंह ठाकुर, धीरज म्हमाने,यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संदीप माने यांनी यापूर्वी शहरातील व पंढरपूर तालुकास्तरीय प्रश्न हाताळले आहेत. ते गाव पातळीपासून ते तालुक्यापर्यंत विविध आंदोलने, मोर्चे,व विविध प्रश्नाबाबत उपोषणे करून तसेच आपल्या शैलीतही हिरीरीने सहभाग नोंदवून कार्य केले आहेत.
या निवडीनंतर संदीप माने यांचे अभिनंदन केले जात असून या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर न्यूज इंडियाशी बोलताना त्यांनी या निवडीबद्दल आभार मानत पक्षाने सोपविलेली जबाबदारी आपण अहोरात्र परिश्रम घेऊन निष्ठेने पार पाडू व केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ,या समाजाचे प्रश्न यासाठी सर्वतोपरी मदत करून तसेच मा.आ.प्रशांत परिचारक तसेच उमेशराव परिचारक यांच्यासह सर्वच जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेऊ अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली आहे.