समानतेचे तत्त्व शिकविणारा आपला प्रजासत्ताक दिन “उस मुकादमच्या” हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. “आष्टी शुगर” आष्टी, तालुका मोहोळ येथील ह्या साखर कारखान्याचे चेअरमन सौ.अंकिता ठाकरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभिनव पद्धतीने प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला.
सामान्यता परिसरातील अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करताना अत्यंत आनंद झाला. या साखर कारखान्यासाठी ऊस मुकादम हा अति महत्त्वाचा असतो. हा संदेश जसा दिला गेला तसेच सर्वजण समान असतात. त्यामुळे हा संदेश देण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असे कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर यादव यांनी सांगितले.
यावेळी “आष्टी शुगर” या कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते. ऊस मुकादमाच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केल्याने एक सामाजिक सलोखा जपण्याचे व एक अनोखा आदर्शही इतर कारखान्यामुळे ठेवला आहे.