काही दिवसांमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली असता देशाचे नेते माजी कृषीमंत्री खा.शरद पवार यांना सोडून भले भले मोठे नेते सोडून गेले असता गेली काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार आले असता कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा पक्षप्रवेश झाला होता परंतु अभिजीत पाटील यांनी शरद पवार गटाची साथ सोडली नाही. पक्षाची जबाबदारी घेऊन अभिजीत पाटीलांनी माळशिरस, टेंभुर्णी, सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माढा येथे शरद पवारांना घेऊन दौरे केले असल्याचे दिसून आले.
अभिजीत पाटलांच्या मागे शक्ती उभी करा,असे मंगळवेढा येथे चक्क शरद पवारांनी सांगितले असलेला शब्द खरा ठरवत अभिजीत पाटील यांनी कामाचा झपाटा लावला दिसून आला आहे. पंढरपूर – मंगळवेढा ग्रामीण शहरी भागात विविध सांस्कृतिक, मैदानी कार्यक्रम घेऊन आपली लोकप्रियता वाढवून, घरोघरी पोहोचण्याचं अभिजीत पाटील जोर देत आहेत.
अभिजीत पाटील यांच्या मागे लाखो जणांची शक्ती उभा करून येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांना आमदार करून विधानसभे मध्ये पाठवू असा प्रवेश केलेल्या मंडळानी उद्गार काढले.पाटील कयांच्यामागे एक मोठी शक्ती मिळाली असून पंढरपूर मंगळवेढा मध्ये गावोगाव खेडोपाडी जाऊन प्रत्येकाच्या सुख, दुःखामध्ये, विविध कार्यक्रमांना भेटी देऊन अभिजीत पाटील यांनी दांडगा जनसंपर्क वाढवण्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मंगळवेढा, पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे देखील अभिजीत पाटील यांनी काम केलेले आहे.
गुंजेगाव तालुका मंगळवेढा येथील डॉ.प्रशांत कांबळे,बालाजी मेटकरी, दत्ता ढोणे, विष्णू नरळे, शंकर चौगुले, सिताराम सातपुते, भारत माने, परमेश्वर डुम, निलेश माने, सिद्धेश्वर डूम, मारुती चौगुले, अनिल चौगुले, रोहित लंगोटे, दादा लंगोटे, अंकुश जगदने, ज्ञानेश्वर कुदळे, नवनाथ बुडबुडे, राजू कांबळे, दिगंबर पवार, आत्मा कांबळे, दत्ता बालगिरे, सुरेश पाटील, पप्पू कांबळे, पप्पू पाटील, नागू चौगुले, नंदू चौगुले, तुकाराम चौगुले, सोमनाथ डुम, प्रकाश सुतार, सागर चौगुले, अमर सुतार, तुकाराम कांबळे, भारत ढोबळे, अनिल ननवरे, ज्ञानेश्वर मेटकरी, सचिन चौगुले, नंदू मिटकरी, राजू कोरे, किसन कांबळे, विलास ढोणे, सोमनाथ काळे, सौदागर कुदळे यासह आदी मान्यवरांनी प्रवेश करत अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाटील यांच्यासोबत काम करण्याचे एक संघ एक दिलाने ग्रामस्थांनी सांगितले..
यावेळी मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, अंधळगावचे सरपंच लहुजी लेंडवे, विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे, रमेश इंगोले, पांडुरंग कोष्टी, विठ्ठलचे संचालक दशरथ जाधव, लक्ष्मी दहीवडी हणमंत क्षीरसागर, डाॅ. राजेंद्र यादव, युवा नेते काकासाहेब मोरे, अजिंक्य बेदरे, विठ्ठल ढगे, पप्पू भोसले, राहूल मेटकरी यासह आदी मान्यवर उपस्थित होते..