आज कुर्डुवाडी शहरात औरंगाबाद येथील मातंग समाजातील मनोज शेषराज आव्हाड या तरुणाची आठ जणांनी निर्घृण हत्या करून त्याचा व्हिडीओ तयार करून तो विविध समाज माध्यमावर प्रसारित केला असून, यामुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नसून गुन्हेगार भरदिवसा गुन्हा करत आहेत. या तरुणाच्या हत्येमुळे सर्व जातीधर्मातील लोक सर्व समाज भडकले असून या सर्व गुन्हेगारांना मोक्का अंतर्गत कारवाई करून अजन्म जन्मठेप अथवा फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत कुटुंबियाला तात्काळ आर्थिक शासकीय मदत देण्यात यावी, यासाठी आज साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या वतीने कुर्डुवाडी पोलीस स्टेशनचे पो.नि विक्रांत बोधे यांना निवेदन देऊन या हत्येचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून आरोपींना फाशीची शिक्षा नाही देण्यात आली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला
यावेळी साम्राज्य आरमार युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश भाऊ पाटील, राजेंद्र वाल्मिकी, सुधीर गाडेकर,बालाजी गायकवाड, राकेश जाधव, सुहास सरडे,किरण शिंदे,निखिल कांबळे,सुरज गायकवाड, सुरज अस्वरे,प्रेम कांबळे, अमोल गायकवाड,सुमित अस्वरे,रोहित अस्वरे,यावेळी उपस्थित होते.