मराठा सेवा संघाचे कर्तव्यनिष्ठ शिवश्री धनंजय बबन देशमुख यांना व्यावसायिक क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित..!

मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. त्यापैकीच एक पुरस्कार म्हणजे पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले ओम लाईट हाऊस या नावाने असलेल्या भव्य दुकांनाचे व्यवसायिक.

या दुकानात येणारे प्रत्येक ग्राहक हा विक्री करण्यापूर्ताच मर्यादित न राहता त्यांना आपुलकीचे वाटणारे..तसेच ग्राहक हा फक्त ग्राहकच न वाटता त्यांना आदराने देवासमान माननारे एक नाव म्हणजे ओम लाईट हाऊस.. ज्या प्रमाणे रामायणात राम, लक्ष्मण आणि भरत त्यांच्या भावांची जोडी ज्या पद्धतीने पहावयास किंवा ऐकावयास मिळाली अगदी त्याच पद्धतीने आजही या ओम लाईट हाऊसच्या माध्यमातून तिन्ही बंधूंचे नाव समोर येते ते म्हणजे संतोष देशमुख, धनंजय देशमुख, विजय देशमुख या तिन्ही भावंडाची संपूर्ण पंढरपूर शहरासह तालुक्यात व्यावसायिक क्षेत्रामध्ये नाव पुढे आले..

याचीच दखल घेत व्यावसायिक क्षेत्रातील शिवश्री धनंजय देशमुख यांना व्यावसायिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, हा पुरस्कार सोलापूर लोकसभेचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले..या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह.भ.प. जयंत महाराज बोधले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. एन. गायकवाड, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अमित निमकर, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील वाघमारे, संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, आदि प्रमुख मान्यवर उपस्थित राहून धनंजय देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला..

यावेळी इतरही वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांनाही पुरस्कार देऊ सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष शिवश्री नितीन उर्फ डी.डी जाधव तसेच सचिव शिवश्री नितीन आसबे व मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *