आले किती गेले किती,
उडून गेले भरारा,
संपला नाही आणि संपणार नाही,
माझ्या भिमाचा दरारा..!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोडनिंब शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी भगवान महावीर यांचीही जयंती साजरी करण्यात आली.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संविधान वाटप करून संविधानाची माहिती करून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचण्याची गरज आहे असे मत मा.प्रशांत गिड्डे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महादेव मांढरे, सुनिल ओहोळ, संजीव शिंदे, बालाजी वाघमारे, अमर ओहोळ, प्रताप रणदिवे व मोठ्या प्रमाणात मोडनिंब ग्रामस्थ उपस्थित होते.