कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर दोन वर्षानंतर माघी
यात्रेचा सोहळा शनिवारी मोठ्या भक्तीभावाने पंढरपुरात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथील करुन परवानगी दिल्याने संंपुर्ण वारकरी मधून समाधान व्यक्त केले जात आहे.
याच निमित्ताने राज्य सरकारचे कृतज्ञा म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुणे येथे विठ्ठलाची मूर्ती भेट देवून त्यांचा सत्कार केला.
मागील दोन वर्षापासून प्रमुख चारही यात्रांवर कोरोनाचे निर्बंध घालण्यातआले होते. त्यामुळे वारकर्यांना पंढरपुरात येवून विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे.त्यामुळे राज्य सरकारने प्रथमच माघी .यात्रेच्या सोहळ्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे लाखो भाविकांना आज माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होता आले.
वारी भरल्यामुळे स्थानिक व्यापारी, छोटेमोठे व्यवसायिकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथील करुन वारी सोहळ्यास परवानगी दिल्याने,राज्य सरकारची कृतज्ञा म्हणून
उपमुख्यमंत्री अजित पवार, पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पंढरपूरकरांच्या वतीने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांनी विठ्ठलाची मूर्ती भेट देवून आणि तुळशीचा हार घालून त्यांचा सत्कार केला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,निवृत्ती पाटील व उद्योग व व्यापार विभागाचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.