कोल्हापूर मधून धनंजय महाडिक च हे कोल्हापूरचे पैलवान ठरले आहे. धनंजय महाडिक विजयी झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले आहे. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर कोल्हापूर मध्ये भाजपने विजयी जल्लोष साजरा केला. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाडिकांना लढायची सवय आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
राजकारणात ज्या पद्धतीने जातो त्या पद्धतीने तो राजकारणात राहतो. जर लक्ष्मण रेषा ओलांडली आणि सीतामाई गेली तसे राजकारणात होते. माणसाने राजकारणात लक्ष्मण रेषा आखून घेतली पाहिजे, असं म्हणत महादेवराव महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना सूचक इशारा दिला आहे.
जिंकणं आणि हारणं यावर महाडिक कुटुंबाचं संकट नाही. ज्यावेळी तो (देव) संकट आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल, अन्यथा महाडिकाला कोणी संकटात आणू शकणार नाही. माझं नाव महादेव आहे, नावच परमेश्वराचं आहे, त्याला कोणी धक्का पोहोचू शकत नाही असे ते म्हणाले.
धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर कोल्हापूर मध्ये भाजपने विजयी जल्लोष साजरा केला. बिंदू चौकात ढोल ताशांच्या गजरात थिरकत गुलालाची मुक्त उधळण भाजपच्या वतीने करण्यात आली. यावेळी आता कसे वाटते गार गार वाटते आशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. महाडिक हे उद्या चार वाजता कोल्हापुरात दाखल होत असून ताराराणी चौकातून अंबाबाई मंदिरापर्यंत त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.