एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत तरंग सुपोषीत महाराष्ट्राच्या व्हाट्सअप चॅट बोट या ॲप वर आणि माझे मुल माझी जबाबदारी या विशेष उपक्रमाचे उत्कृष्ट अंमलबजावणीत सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची करण्यात आली निवड.
8 मार्चचे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कोविड महामारीच्या कालावधीत सर्वोत्कृष्ट काम करणारे जिल्हे व जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांचा राज्याचे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय महसूलमंत्री, माननीय महिला व बाल विकास मंत्री या मान्यवरांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे सन्मान सोहळा आयोजित केला गेला आहे.
तसेच सुपोषीत तरंग ॲपमध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या एकात्मिक बाल विकास अधिकारी श्री. सरडे सर यांचे सोलापूर जिल्ह्यातूनही निवड झाली असून, हा ही पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथेच पार पडणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून शुभेच्छाही देण्यात आले.