सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका चित्रफितीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, ही केवळ एक अफवाच असून, अशा प्रकारची घटना सोलापूर किंवा शेजारच्या जिल्ह्यात कुठेही घडलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरविली जात आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नसल्याचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. लहान मुलांना पळवून नेण्याची घटना सोलापूर जिल्ह्यात किंवा आजू बाजूच्या जिल्ह्यात कोठेही घडली नसल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यात कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटनेची नोंद नसून, अशी कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नसल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.
२४ तास गस्तसध्या सणासुदीचे दिवस असल्याने पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिसांची २४ तास दिवस-रात्र गस्त सुरू आहे .शाळा-महाविद्यालयांना सतर्क राहण्याची सूचनाशाळा, महाविद्यालय प्रशासनाने सोशल मीडियावरील अफवांवर विश्वस ठेवू नये. अशा अफवा पसरवू नये. असे काही आढळून आल्यास जवळच्या पोलिस स्टेशनला संपर्क करावा.लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरविणारी चित्रफित सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात काही नागरिक एका मारहाण करताता दाखवित असून, ही व्यक्ती लहान मुलांना पळवून नेताना आढळून आली असून, तिचे साथीदार जिल्ह्यात फिरत असल्याचे या चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात येत आहे. एका ठिकाणी या अफवेतून चार साधूंना तर अन्य एका घटनेत तृतीय पंथियाला मारहाण झाली. तिच चित्रफित दाखवून लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सोलापूर जिल्ह्यातही सक्रिय असल्याची अफवा पसरली जात आहे. मात्र, ही चित्रफित खोटी असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.