मेसेज करण्यास सांगा,असे म्हणत केला महिलेचा विनयभंग; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..!

तुमच्या मुलीला मला मेसेज करायला सांगा असे म्हणत पीडित तरुणीच्या आईला दमदाटी करून विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्ण शिवाजी बनसोडे (वय-२३,रा.सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

ही घटना दि.१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोलापुरात घडली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पीडित मुलीची आई,वडील आजी घरी असताना वरील संशयित आरोपी हा सकाळच्या सुमारास घराजवळ येऊन पीडित तरुणीच्या आईला म्हणाला की, तुमच्या मुलीला मला मेसेज करायला सांगा मेसेज नाही केला तर मी तुमच्या घरावर दगड फेक करेल, असे म्हणून पीडीत तरुणीच्या आईला दमदाटी केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *