दि २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २:३० सुमारास तहसीलदार मोहोळ आपल्या दालनात अर्ध नाईक प्रकरणांमध्ये तहसीलदार सुनावणी करत होते. त्यावेळी तात्या दगडू टाकले राहणार ढोकबाभूळगाव येथील व्यक्ति हे तहसीलदार मोहोळ दालनाच्या बाहेर मोठ्या आवाजात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होते. त्यांना तुमचे कोणते काम प्रलंबित आहे का? काय काम आहे? याबाबत विचारणा केली असता कोणतेही उत्तर सदर व्यक्तीने दिले नाही. सदर व्यक्ती अर्वाच्च भाषेत शिवीगाळ मुळे तहसीलदार मोहोळ यांचे अर्धन्यायिक कामकाजाचे दालन साधारण दहा मिनिट बंद पडले. सदर प्रसंगी उपस्थित अव्वल कारकून श्रीमती भरगंडे यांनादेखील शिवीगाळ करण्यात आले, त्यामुळे सुरू असलेल्या शासकीय कामकाजात त्यांना त्यांच्या वर्तणुकीमुळे अडथळा निर्माण झाला. सदर व्यक्ती प्राथमिक दृष्ट्या मद्यपान केल्याचेही दिसून येत होते.
त्यामुळे तात्या दगडू काकडे यांना विनापरवाना, विना मास्क, तहसीलदार यांच्या दालनात व बाहेर मद्यपान करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्या या बेकायदा व बेजबाबदार वर्तणूक करणाऱ्या तात्या दगडू काकडे यांना त्यांच्या विरुद्ध आयपीसी ३५३, १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच भा.द.वि.स.कलम ३५३, ५०४, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने हे करीत आहेत