कुरूल येथे कै.विष्णु (बाबु) धोत्रेे यांच्या स्मरणार्थ 2023 भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानादरम्यान तालुक्यातील पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक राजू खरे यांचा पुढाकार.
मोहोळ विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे यांनी मोहोळ मतदार संघातील जनतेला स्वखर्चातून मोठा आधार दिला जात आहे. कै.विष्णु (बाबु) धोत्रे यांच्या स्मरणार्थ १७डिसेंबर रोजी कुरूल येथे जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले यासाठी उद्योजक राजाभाऊ खरे यांनी ७१हजार रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आयोजकांकडे रोख सुपूर्द करण्यात आले होते या प्रसंगी सदर स्पर्धांची कुस्ती उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या मार्फत लावण्यात आली.
मोहोळ मतदारसंघातील रस्ते, दिवे,डिपी या मुलभूत प्रश्नांसोबत गावखेड्यात कुस्ती क्षेत्रात कुस्ती खेळणा-या पैलवानांसमोर सुद्धा मोठे आव्हानं आहेत. एका हमाल कामगारांचा मुलगा पै.सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी होतो तर कुस्ती क्षेत्रात नवीन पैलवान घडविण्यासाठी पैलवानांना प्रोत्साहन दिले पाहिजे यासाठी पदोपदी मदत करीत आहोत. उत्तम कुस्ती खेळणार-या पैलवानांना राज्यस्तरीय पातळीवर पोहोचण्यासाठी कुरूल पंचक्रोशीत भव्य दिव्य कुस्ती संकुल उभारणार असल्याचे उद्योजक राजाभाऊ खरे यांनी यावेळी सांगितले.
या कुस्ती स्पर्धेसाठी माजी नगराध्यक्ष न.प.पंढरपुर मा.वामन(तात्या) बंदपट्टे,वस्ताद पै.बाळासाहेब चवरे,मोहोळ विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख मा.प्रकाश(दादा)पारवे,बेगमपुर सरपंच मा.प्रकाश सपाटे, रंगनाथ गुरव युवा नेते मा.गणेश जाधव,उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख मा.उमाकांत करंडे, मोहोळ तालुका उपप्रमुख मा.अमर सोनवले,मा.चंदनशिवे सर,मा.लखन वाघमारे,मा.निखील गायकवाड,मा.आतिश सावंत व समस्त कुरुल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.