कोरोनाचा दोन वर्षांचा काळ आठवला तरी अंगाचा थरकाप उडतो, काळजाचा ठोका चुकतो ! या महामारीने माणसं संपवली, माणुसकी संपवली … ज्याला त्याला होती मरणाची भीती ! कुणी कुणाला भेटत नव्हतं की कुणाच्या अंत्यविधीला जात नव्हतं … कुणाला साधा खोकला आला तरी माणूस माणसांपासून दूर पळायचा …. दुनियेतलं राहू द्या, घरातली माणसं, जवळचे नातेवाईकसुद्धा जवळ येत नव्हते… डोळ्यासमोर दिसायचा तो फक्त मृत्य…!
या संकटाच्या काळात जवळ यायचा तो एकच माणूस …. त्याचं नाव डॉक्टर….!! ओळख असेल किंवा नसेल, आस्थेने विचारपूस आणि चौकशी करायचे, धीर द्यायचा आणि उपचारही करायचा तो हा एकच माणूस…. त्यालाही जीव आहे, पण आपला जीव धोक्यात घालून अखंड राबायचा तो फक्त आणि फक्त डॉक्टर…..! डॉक्टर हा कायम देवाचेच दुसरे रुप … कोरोना गेला आणि लोकही या देवाच्या देवत्वाला विसरले ! भाजपने मात्र ही आठवण ठेवत मोहोळ तालुक्यातील एका महिला डॉक्टरांची आठवण ठेवत त्यांची भाजपच्या डॉक्टर सेल अध्यक्षपदी निवड करुन सन्मान केला आहे … आष्टी गावचे सरपंच डॉक्टर अमित व्यवहारे यांच्या पत्नी असलेल्या डॉ. प्रतिभाताई व्यवहारे यांचा भाजपने उचित सन्मान केला आहे,त्यामुळे मोहोळ तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे..!
सामान्य रुग्णांसाठी चंदनासारखं झिजणाऱ्या प्रतिभाताई ज्याला त्याला आपल्या वाटतात….. त्यांची सेवाभावी वृत्ती प्रत्येकाला भावते. आडनाव व्यवहारे असलं तरी व्यवहार न पाहता सेवाभाव जपतात. तसं पाहिलं तर हे कुटुंबच आखंड सेवेत आकंठ बुडाले आहे. त्यांचे सासरे डॉक्टर, त्यांचे पती डॉक्टर आणि त्याही डॉक्टर…! एका घरात तीन देव ..! सकाळी घरातलं पहायचं, लगेच जनसेवा सुरु करायची हा प्रतिभाताईंचा नित्यक्रम. आता मात्र त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी पडली असून भारतीय जनता पक्षाने मोठा विश्वास जपत त्यांची भाजप महिला मोर्चा डॉक्टर सेल च्या मोहोळ तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या सेवाभावाचा हा सन्मान मानला जात आहे ..!
पती डॉक्टर, सासरे डॉक्टर आणि स्वतः डॉक्टर असा परिचक्र असून त्याचबरोबर कौटुंबिक सर्वस्वी आपली जबाबदारी सांभाळणाऱ्या अश्या नारी स्त्री शक्तीला न्यूज INDIA मराठीचा सलाम..!