मोहोळ शहरातील साठे नगर मध्ये अवैध गुटका साठवून ठेवणे असल्या बाबत, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना गोपनीय माहिती मिळाली असता त्यावरून मोहोळ पोलीस ठाणे यांनी मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी सदर छापा टाकला असता, विक्रीकरीता या एका गाळ्यामध्ये गुटखा व इतर पान मसाल्याचा साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आले.
तसेच अन्नभेसळचे निरीक्षक श्री. कुचेकर यांना तात्काळ याची माहिती देऊन गुटखा व पानमसाला साठवून ठेवलेल्या मालकास मुद्देमालासह ताब्यात घेऊन व साठवून ठेवलेल्या मालाची किंमत अन्नभेसळचे कुचेकर यांनी तपासून पाहिले असता त्याची किंमत अंदाजे एकूण तीन लाख बारा हजार तीनशे चाळीस रुपये एवढ्या किमतीचे असून त्यामध्ये आर एम डी,सुगंधी तंबाखू, गोवा, रजनीगंधा, पान मसाला, रत्ना सुगंधी तंबाखू, बाबा ब्लॅक चेविंग तंबाखू, विना लेबल सुगंधी तंबाखू, अशाप्रकारचा मुद्देमाल मिळून आला. ताब्यात घेतलेले आरोपी राजकुमार शिवशंकर कुर्डे, राहणार साठे नगर मोहोळ, येथील रहिवासी असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 188, 272, 273, 328 अश्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल होऊन आरोपीस अटक करण्यात आली. याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुनगे हे करीत आहेत.
सदरची ही कामगिरी पोलीस निरीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम,मा.अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव साहेब, मा.पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक सायकर साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे,पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे, पोलीस नाईक अमोल घोळवे, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग जगताप, हरीश थोरात, यांनी ही कामगिरी बजावली आहे.