या गावात झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी होऊन ग्रामपंचायत व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अन्यथा पंचायत समिती समोर करणार रस्ता रोको आंदोलन..!

दि.०१/११/२०२२रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष मा.श्री शशिकांत पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड या गावातील निकृष्ट दर्जेची कामे झालेली असल्याने सोलापूर जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पंढरपूरला आले असता, त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यामध्ये अजनसोंड गावातील निकृष्ट दर्जेच्या लवकरात लवकर दखल घ्यावी व ग्रामपंचायतीवर व भ्रष्ट आधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

या आधीही २१ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथे याच कामेबाबत धरणे आंदोलन करण्यात आले होते. तरी देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठबळ न देता लवकरात लवकर त्या कामाची चौकशी व्हावी, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दि.१५ नोव्हेंबर २०२२ रोजी, पंचायत समिती ऑफीसच्या समोर रस्ता रोको आंदोलन मा.दिलीप बापु धोत्रे (मनसे नेते) याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिला आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेना पंढरपूर शहराध्यक्ष अवधूत गडकरी,रोहन पंढरपूरकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *